छायाचित्रांवरती माझ्या कैक तारका फिदा
खुद्द माझियावरती मरती खलनायक पण सदा
स्वरुप मनोहर तेजस कांती झळाळते मम दिव्य
झोपडीत मम माझे गुरुजन येतिल सारे भव्य
पुत्र आणखी कन्या माझी हृदयीची दो रत्ने
मात-पित्यांना गुरू मानुनी मोक्ष मिळविती यत्ने
बिजागरीशी जोडुन नाते नट नि पाना माझा
बोल्ट आवळुन झाकण बसवी वाजवीत ग बाजा
शशांक मधुरा सुभाषसंगे माझी मैत्री खरी
मीच ‘सुनेत्रा’ मला पाहण्या या जैनांनो घरी
मात्रावृत्त – (१६+११=२७ मात्रा)