चैत्रात उधळे नाविन्य कोणी
वैशाख खोदतो कांचन खाणी
ज्येष्ठोबा गातो पावन गाणी
आषाढ दिक्पाल रावण मानी
रंगात भिजणार श्रावण राणी
भादवा हासतो जिंकुन ठाणी
धान्याच्या भरेल आश्विन गोणी
दिव्यांनी सजणार कार्तिक वाणी
मार्गशीर्ष बांधे तोरण पाणी
पौषात लुटावी गुलाब दाणी
माघात लाघव लावण्य मौनी
सुनेत्रा रंगीत फाल्गुन सोनी
मात्रा-अठरा(१८)