In this poem the poetess says, I am very happy person. I am the queen in my house. I want to live as I want. I want to sing songs, live in house on the hilltop. I shall fly kite in the sky. I want to cut all kites flying in sky, if they fly like fluttering foes.
मनमौजी मी एक दिवाणी
मी माझ्या राज्याची राणी
राज्य ऋतूंचे राज्य धरेचे
राज्य जलाचे अन वाऱ्याचे
अग्नी इथला कुणा न जाळी
अंबर या बागेचा माळी
कोकिळ मैना भारद्वाज
चंडोलांची मैफल खास
चैत्र-पालवी वसंतवारा
दऱ्या- डोंगरी श्रावणधारा
बांधिन घरकुल डोंगरात मी
पतंग उडविन वादळात मी
मांजा माझा काचेरी बघरे
कटवित जाईल पतंग सारे
चढाओढीची काटाकाटी
जरी न बुद्धी साठी-नाठी
अशी कशी मी अजुन शहाणी
मी मनमौजी एक दिवाणी