डोळ्यात साठलेला घनगर्द भाव पाहू
मेघात दाटलेला मल्हार राग गाऊ
उडवीत मृत्तिकेला वाहील मस्त वारा
जलदातुनी सुखाच्या वर्षोत प्रेमधारा
नाचोत पंचभूते देहात कोंडलेली
तुटूदेच साखळीही हृदयास काचणारी
हातात हात घ्यावा तू नाचऱ्या विजेचा
कर श्वास मोकळा तू मौनातल्या धरेचा
ही वीण घट्ट मी ची उसवेन मी स्वतःही
आभाळ बरसता हे बरसेन मी स्वतःही