गान हृदयीचे वा देहाचे
ते गाणे असते
इंद्रियांच्या शक्तीचे ते
मोजमाप असते
अपुले अपुले गाणे सुंदर
आपण गावे द्यावे
गाता गाता जगत अलौकिक
दिपवुन टाकावे
कधी न करावी चोरी आपण
दुसऱ्यांच्या पैशांची
स्वकष्टाने धन कमवावे
मिळेल सुख शांती
वंशवेल वाढण्या आपुली
कुटुंब जपणे धर्म
देशाचे स्वातंत्र्य टिकविण्या
अभिव्यक्ती धर्म