ताल मज साधायचा
सूर मज पकडायचा
लय मला पकडायची… माझिया गझलेतली….
भावघन गाण्यातला
भाव मज सांडायचा
अर्थ पण जाणायचा… माझिया जगण्यातुनी ….
गोष्ट मज ऐकायची
गोष्ट मज सांगायची
गोष्ट मज वाचायची… माझिया दृष्टीतुनी ….
मिळविली दृष्टी खरी
जगवुनी सृष्टी खरी
अंतरी यष्टी खरी … माझिया धर्मातली….