वाटे – VAATE


किती ग सुंदर चंद्रकळेवर हळद कुंकवाची बोटे
किती ग काळी रात्र तरीही भय ना कसले मज वाटे
किती ग चंचल हरिणी त्यांचे टपोर भिरभिरते डोळे
किती ग छुमछुमणारे त्यांचे पैंजण पायीचे वाळे
किती देखणी गुलाबदाणी घाटदार बांधेसूदही
सुगंध भरली अत्तरदाणी हृदय जणू बन फुलवारी
लाल गुलाबी रंग केशरी पश्चिम भाळी ल्यालेली
बाग गुलाबांची पिवळ्या ग आहे अजुनी फुललेली
आठवता ते गुलाब आई गळले भवतीचे काटे
तुझ्याचसाठी काढुन ठेवीन सुंदर गझलांचे वाटे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.