जळात मी मन मंदिर माझे रेखांकित केले
लहरींवरती तरंगणारे उभे शिल्प केले
शांत पीत जल लाटांवरती हरित नील धरती
पंच शिखरयुत राउळातल्या घंटा झांजरती
अवती भवतीचे मोक्षार्थी नर नारी सुंदर
नीर नदीचे संथ वाहते त्यात झुले अंबर
देउळ की हे जहाज अपुले शिखर कळस हृदया
तीर्थंकर चोवीस शिरोमणि बेल पळस हृदया