In this poem the poetess describes the earth and nature when rain comes.
पावसात न्हातिल पक्षी चिंब चिंब होत
सुकवतील शुभ्र पंख कोवळ्या उन्हात
पुष्पगंध नेत शीळ घालतो ग वात
लक्ष लक्ष झुलतिल घरटी गर्द वाटिकेत
मृत्तिकेत उगवतिल हरित पीत हात
क्षितिजावर इंद्रधनुत रंग सहा सात