पृथ्वी पाणी, अंबर वारा
सालामध्ये, महिने बारा
चैत्र आदि जर, अंत फाल्गुनी
पुनश्च फुलवी, सतेज अग्नी
सुरू कराया, नेत्र दिवाणी
सहा ऋतूंची, सजग कहाणी
वसंत देई, वासंतिक क्षण
हसते फुलते, अवघे तन मन
ग्रीष्मामधली, ग्रीष्म झळाळी
पांगविते घन, छाया काळी
वर्षा धारा, वर्ष सजविते
बीज तरू फळ, शेती जपते
हेमंतातिल, हेमश्रीमंती
प्रदान करिते, भूवर शांती
शरद चांदणे, सुंदर रात्री
शुभ्र शारदा, श्यामल गात्री
चंचल शिशिरा, शिशिर गोठवी
नेणीवेतिल, मौन जागवी
ठिणगी टिकवी, फुंकर चारा
मुक्त करितसे, खगास कारा
मात्रा-सोळा=(आठ+आठ), १६=८+८