सा रे ग म प ध नी सा
सा नी ध प म ग रे सा
जीव म्हणे म्हण गाणे
गात जाय घन गाणे
रातराणि फुल वाती
काजव्यात फुलताती
समईच्या दीप कळ्या
बघुनीया तम पळे
वाट जरी वळणाची
ओळखिची चढणीची
गात गात घाट चढे
रानातुन जाय पुढे
सा रे ग म प ध नी सा
सा नी ध प म ग रे सा
अष्टाक्षरी गीत – १२ मात्रा