This poem is known as haasya-kavita. Such type of poems, some times look funny but sometimes we must think over them more seriously and with positive attitude.
सामोशाला तळे जरी ती हात भाजले त्याचे ग
मिरची आणिक चटणी संगे खात राहिले सारे ग
गोल त्रिकोणी शंकू सम ते रंग बदामी त्यांचा रे
शुभ्र मनाने खाता खाता पीत जाहले वारे ग
किती खाऊ मी कैसे पचवू प्रश्न मला ना पडला हा
उदरभरण कष्टाने केले सार्थक झाले त्याचे ग
सोबत करण्या खंबीर माझी, मैतर स्वामी खरा सखा
दोन लेकरे गोड धाडसी जणू नभीचे तारे ग
(चाल- आडोशाला उभी जरी तू नयन जाहले आतुर ग)