कुंतल मेंदीमध्ये भिजवुन
बसली आहे मीरा वाकुन
निघून गेल्या घटिका प्रहरे
मूक मौन खेडी अन शहरे
उठ ऊठ तू मीरे आता
पाणवठी जा बनून राधा
बैस जळी त्या बुडवुनी पाय
पाण्यावर ती येईल साय
करून गोळा त्या सायीला
घुसळ घुसळ लोणी वर याया
गरम भाकरीवरती लोणी
खाण्यासाठी येईल कोणी