सुंदर सुंदर – SUNDAR SUNDAR


आज दिवस सौख्याचा सुंदर
उजळुन जाईल मनीचे अंबर
किणकिण मंजुळ गाईल झुंबर

हसेल मम नेत्रांचे मंदिर
सर पुण्याची येईल सरसर
पापांची मग मिटेल घरघर

शुद्ध सरींनी भिजेल अंतर
निसर्ग गाणे म्हणेल सुंदर
सुंदर सुंदर अतीव सुंदर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.