सैपाक – SAIPAAK


पहाट झाली बाई
आता- सैपाकाची घाई
विसळ भांडी विसळ
गुंडीत ताक घुसळ
मळ कणिक मळ
दाब नळाची कळ
पालेभाजी ताजी
धुवून चिर भाजी
फोडणी घाल झकास
खमंग तिखट खास
पोळ्या लाट पोळ्या
मऊ मऊ पातळ
भाज हलके हलके
करू नको वातड
गोल गोल डबा
त्याला स्वच्छ धुवा
कोरडा छान करा
त्यात जेवण भरा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.