इंग्रजी साहित्यातील ‘चिकन सूप’ या ललित-बंधांच्या पुस्तक मालिकेप्रमाणे काहीतरी लिहावे असा आज
सकाळीच मी मनोदय व्यक्त केला. जर हा मनोदय संकल्प बनला तर तो यथावकाश पूर्ण होईलच! त्या पुस्तकासाठी मी ‘सोलकढी’ हे नाव निश्चित केले आहे. माझ्या कुटुंबियांसमवेत कोकण सहलीला गेलेली असताना माझ्या आठवणीनुसार मी सर्वप्रथम ‘सोलकढी’
प्यायले. तेव्हापासून ‘सोलकढी’ हे माझ्या प्रिय पेयांपैकी अतिशय प्रिय पेय बनले. म्हणूनच आजची ही माझी कविता त्या खास सोलकढीसाठी!
आवडते मज सोलकढी
तूप कढविते लोणकढी
जिरेभात दही साळीचा
घावन डोसा जाळीचा
मऊ हुदळगी आंबोळी
हुरण होळगी वा पोळी
झुणका भाकर ज्वारीची
खास ढोकळी डाळीची
अंगत पंगत बसवूया
सोलकढी त्या वाढूया