Tag: Mukt-chhanda

  • साधना – SADHANA(PRACTICE)

    काय साधले त्यांनी… त्यांचे त्यांना लखलाभ मातृधर्म माझा ….जपेन मी अंतापर्यंत जिनधर्मी आहे… अहिंसा माझ्या आत्म्याचा स्वभाव संवर आणि निर्जरेने … साधेन माझी साधना शब्दांवरती प्रभुत्व असो नसो …. माझे शब्द कधीच नाही करणार जीवांचा घात ! करेन कसरती अक्षरांना जुळवित पण जीव जपेन… जीव जपेन …. मीच माझ्या… जीवनाची जादू !! माझा मातृधर्म !!आत्मधर्म!!!!!…

  • विमल मावशी – VIMAL MAVSHI(AUNTY)

    विमल मावशी ! ओन्ली विमल .. विमल मावशी….. पुन्हा भेटली विमल मावशी मनमोकळी बडबडी मावशी दूरध्वनी वर जरी बोलतो मनोमनी संवाद साधतो… आठवते मज… लांब केस वेण्या छान झुळझुळ साडी मूर्ती सान डोळ्यावरती काळा गॉगल ऊन प्राशुनी करण्या शीतल बुद्धीवंत अन हुशार खूप साधे निर्मळ सात्विक रूप विनम्र वृत्ती निरहंकारी बोलायाची सदा तयारी तिचा जन्मदिन…

  • घटना – GHATANAA(CONSTITUTION)

    पंचोळी … घटना घटना असुदे अथवा घट पट त्यांस असावा प्रकृतिचा तट मातीवर संस्कार करूनी घट संस्कारित कुंभाराच्या हाताचा आकार झेलूनी मृत्तिकेतले उपादान साकार जाहले… तीन शेरांचे मुक्तक ..ग्रंथ काल खेळली रंग लेखणी मस्त खरा आज चाटुनी कोप नाचरा फस्त खरा काय शिकविते गझल ओळखू सार बरे मित्र जवळचा ग्रंथ सत्य आश्वस्त खरा रंगवायला चित्र…

  • कोसला – KOSALA(A COCOON)

    प्रीतकी जंजीर हो या अभिमानका खंजीर, भाषा ब्रह्मांडकी हो या पिंडकी, धर्म राष्ट्रका हो या देशका,अथवा प्रादेशीक.. हृदयका धर्म प्रेम होता हैं … दोन रुबाया १) कोसला.. होऊन फुलपाखरु मकरंद प्राशाया कोसला धडपडे कोष फोडुनी सुटण्या घोळात रुबाई मात्रांच्या पण येई स्वातंत्र्य जपाया मार्ग स्वतःचा घेई… २) पाकळी मृदु पाकळी मनाची प्रेमे उलगडता दवबिंदुत भिजुनी…

  • वाह व्वा! – VAAH VVA (BRAVO!)

    वाह व्वा वाह.. व्वा … या मुलींना सा.. र… काही कळत कळत …नकळत जुळत जातं … नकळत जुळत जुळत मळत पण जातं … म्हणून सांगते मुलींनो …आणि मुलग्यांनो , फार मळू … देऊ नका… वळायचं तेवढं वळून घ्या… कारण नंतर किती रडा …किती जोडा … उपयोग नाही होणार… ज्याच्या त्याच्या कर्मांचा हिशेब… चुकता मात्र करावाच…

  • रत्नत्रय दीपक – RATNATRAY DIPAK (THE THREE JEWELS LAMP)

    अप्पदिवो मम अलख निरंजन नय दृष्टी सम अलख निरंजन कर्मफळे रसमय मिळवाया रत्नत्रय दीपक उजळाया व्यवहाराचा जम बसवाया मुक्तछ्न्द तम भ्रम पळवाया जीवाचा अभ्युदय व्हाया

  • हसूत पसरट अथवा तिरके – HASOOT PASARAT ATHVAA TIRAKE (WE LAUGH BROADLY OR …)

    हसूत पसरट अथवा तिरके आम्ही स्वतःशी वा कोठेही घेऊ काळजी स्वतः स्वतःची .. वा जगताची कशास चिंता मग जगताची सार मिळो वा सांबाराचे मारू भुरके हसूत पसरट अथवा तिरके उपदेशाचे किती फवारे तुमचे तुम्हा लखलाभ होऊदे सतत हसावे अन हसवावे कुणी न उरले आता परके हसूत पसरट अथवा तिरके एकांतीही हसून घ्यावे पोट भरावे ..…