मृत्यूनेही मान झुकविली ओशाळून नाही
सलाम केला वीरत्वाला झाकोळून नाही
मृत्यूंजय तो शंभू राजा वंदू त्या आत्म्याला
स्मरणी ठेवू गाथा त्याची जगास कळण्याला
धर्म देश अन स्वधर्म जपण्या झुंज दिली त्याने
फितूर झाले भ्याड तयांना संपविले त्याने
धडा शिकविला त्या भ्याडांना कवटाळून मृत्यू
आत्मशत्रूला जिंकत गेला अमर्त्य अमुचा शंभू
शिवरायाचा अमर पुत्र हा शिवरायासम शूर
कीर्ती त्याची पसरत गेली दूर दूर दूर