स्वहित – SWAHIT


स्वहित …
स्वहित साधुनी पुनीत झाले अंतर माझे
परहित करते सहज सहज मन अंबर माझे
सत्य शोधण्या मार्ग अहिंसक स्वीकारोनी
स्वतःस करण्या सिद्ध कैक हे संगर माझे

ओळ …
उषःकाल हा सुरभित ओला
पाऊस धारा मनात ओळ
चाफा पिवळा भिजत धरेवर
टपटपलेला म्हणतो बोल

सुंदर
किती सुंदर…
आयुष्याचं पान असतं
जणू कागदाचं
पान असतं !
स्वतःसाठी लिहिलं की
भविष्य बनतं !!
स्वतः लिहिलेलं
स्वतःच
भविष्य …….
खरंच किती सुंदर असतं!!!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.