इरसाल – Of the richest flavour


ना..जुक धक्का लहरी.. हवेचा ..
हिंदोळते तन मन पान गाते
जाळी कशी रेखून साजुक …
आकाश आभाळ भरण्यास येते…
… …
नाजुक धक्का लहरी हवेचा
पाऊस धार ..मुसळासमान
ओतून हंडे थकली न बाई
पहाटे ..पहाटे ..निजली जराशी

नाजुक धक्का देऊन जलदांस
पुन्हा सकाळी उठली धुवाया
धरणे नि जोहड ..टाक्या नि मोऱ्या ..
शेवाळलेल्या …भंजाळलेल्या …

नाजुक धक्का .. देतेय अंगठी
सच्च्या सयींची किलकारी कंठी
जैसे निखळती माणिक मोती..
उचलून वाकून भरली ग पोती …

नाजुक धक्का…
इरसाल पक्का…

, ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.