देहमंदिरी हृदयामध्ये ..
अमूर्त आत्मा माझा आहे
एक मनाच्या दोन मैत्रिणी ..
जाणीव आणि नेणीव पाहे
सजग जाहली जाणीव जेव्हा ..
नेणिवेशी जोडत गेली ..
एक अनामिक बंध जोडूनी ..
पूल छानसा बांधत गेली..
एक जादुई नाजुक सुंदर ..
कांडी फिरली तनामनावर ..
अंतरातली सृष्टी माझी ..
सत्यामध्ये अवतरल्यावर …
जाणिवेची सगुण मूर्ती ..
प्रतिमा दिसली मम् आत्म्यातील…
जाणिवेची सगुण मूर्ती …
तयात नेणीव भरते स्फूर्ती..
नेणिवेतली .. ऊर्जा शक्ती ..
हृदयी माझ्या भरून शांती …भरून शांती …
यशोगान अन भक्ती प्रीती…
नेणीवेची असीम शक्ती…
दहा दिशांनी वाहत आहे..
जाणीव भरूनी…वाहत आहे ..
सांडत आहे ..
पात्र मनाचे.. पात्र मनाचे ..
मन माझे हे माझ्या आधीन ,,
नेणीव खजिना माझ्या आतील…
खजिन्याची या विहीर बाई ..
त्यातून गाते माझी आई..
माझी आई.. माझी बाई ..
क्षमाशील जणू धरणीमाता
माझी आई ..
गीत क्षमेचे तिचे लिहाया ..
लेखणीत मम भरते शाई…
निर्झर होऊन .. झरे लेखणी …
लिहीत जाई कागद भिजवीत…
चिंब चिंब मम तनमन होई..