In this ghazal it is said that the black night is now gone. Night went away with all its shadows & miseries. The night has left us a message that we should search the paths of light. This ghazal is written in aksharganvrutta. The vrutta used in this ghazal is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA.
अंधार सावल्यांचा घेऊन रात्र गेली
शोधा प्रकाशवाटा सांगून रात्र गेली
गीतात भावसुमने गुंफीत जागता मी
चिरशाप वेदनेचा देऊन रात्र गेली
गळल्या कितीक उल्का सरताज चांदणीला
का बीज मत्सराचे पेरून रात्र गेली
आला वसंत दारी फुलली फुले नव्याने
होळीत भग्न हृदये फेकून रात्र गेली
सत्तेस रात्र प्यारी अंधार काजव्यांना
हा कायदा निराळा कोरून रात्र गेली
ती आग ना ‘सुनेत्रा’ ती सांजवात होतो
हृदयात लक्ष पणत्या लावून रात्र गेली
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.