This Ghazal is written in matravrutt(16 matras). Radif is ‘yaannaa’ and kafiyas are kalel, basel, rakhel, ghadel etc. In this Ghazal some social and critical problems are discussed .
पोळीची चव कळेल यांना
चापट जेव्हा बसेल यांना
पंख कागदी हवा मस्तकी
बिसलेरीही चढेल यांना
घरात पत्नी गुणी देखणी
तरी लागते रखेल यांना
कासाराचा हात मोडती
कोण बांगडया भरेल यांना
नको वीष अन नको सापळा
उंदिर सुद्धा धरेल यांना
धम्मक लाडू मम खाताना
घाम दुधाचा फुटेल यांना
गुलाम म्हणतिल सुनेत्रास जर
अद्दल खाशी घडेल यांना