असा दिवाणा माझा हंटर – ASAA DIVAANAA MAAZAA HUNTER


This Ghazal is written in 48 matras. Here radf is, ‘Asaa divaanaa maazaa hantar'(असा दिवाणा माझा हंटर) and kafiyas are paanyaamadhye, premaamadhye, rastyaamadhye etc.

कडाडता जो, कुंपणवासी, उडी टाकतिल, पाण्यामध्ये, असा दिवाणा माझा हंटर!
मायाचारी क्षुद्र कीट ही, पडतिल ज्याच्या, प्रेमामध्ये, असा दिवाणा माझा हंटर!

ब्रम्हांडावर, टाकुन दृष्टी, पकडुन त्याला, माझ्या हाती, गरागरा मी, फिरवी जेंव्हा;
भवनामधले, अभिमानी जन, प्राण सोडती, रस्त्यामध्ये, असा दिवाणा माझा हंटर!

पळतो जेंव्हा, तो वेगाने, उष्ण हवेचे, झोत झळकती, व्याधि-विषाणू, जळून जाती;
बालक-लीला, पाहुन त्याच्या, गाय हंबरे, गोठ्या मध्ये, असा दिवाणा माझा हंटर!

शुभ्र, तांबडी, पिवळी वसने, नेसून बाबा, तपास बसता, नागफण्यासम, डोल डोलतो;
जरी जीव ते, सोवळ्यातले, भिजवी त्यांना, रंगामध्ये, असा दिवाणा माझा हंटर!

अणु परमाणू, विलग करोनी, तोळामासा, भाव तोलुनी, सहस्त्र रश्मी, सूर्यासम तो;
उघडे सारे, लख्ख दावतो, भरतो जीवन, श्वासामध्ये, असा दिवाणा माझा हंटर!

गझल मात्रावृत्त (एकूण मात्रा ४८)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.