आक्रीत काय घडले आवाज बंद म्हणता
कोडे कुणास पडले आवाज बंद म्हणता
पिवळे गुलाब खुडुनी जे जे पसार झाले
भवरोग त्यांस जडले आवाज बंद म्हणता
ऐकून शब्द प्रीती बुडुनी भ्रमात फुगता
शिशिरात ढोंग झडले आवाज बंद म्हणता
बोलावयास त्यांना उरलेय काय आता
मौनात भाव दडले आवाज बंद म्हणता
समरले मला न काही कारण कळावयाला
वाटेस कोण नडले आवाज बंद म्हणता
खुद्कन हसून गाली आले कुशीत माझ्या
मम बाळ नाही रडले आवाज बंद म्हणता
चारून धूळ राडा जिंकून हृदय आले
घोडे कुठे न अडले आवाज बंद म्हणता