आल्या ग नाचत पाऊस धारा आश्विनासंगे
वाजवी पावा रानात वारा आश्विनासंगे
सोवळे नेसुन जानवे घालुन मंत्रास बोले
उपाध्या गुरुजी शोभतो तारा आश्विनासंगे
देहात मौनी बैसला आहे आत्माजीराव
गावया अधीर फोडून कारा आश्विनासंगे
मातीस ओल्या आकार देण्या हस्त हे माझे
पाडण्या बुंदी धरतात धारा आश्विनासंगे
काव्यात झरझर नाव गुंफाया कवयित्री तुझे
शाईचा गाढ उतरेल पारा आश्विनासंगे
गझल मात्रावृत्त (९/९/९/) २७ मात्रा