आपणच लिवायचं
आपलं नशीब आपणच लिवायचं
चांगलं वागायचं !
ते नसतं लिहिलेलं
तळहातावर किंवा तळपायावर !
कपाळावर सुद्धा नाही दुसरा कोणी लिहीत
आपणच लिहितो आपलं विधिलिखित !
आजच आज लिहा उद्याच उद्या !
दुसरा कोणी बसलाच तुमच नशीब लिहायला
तर टाकाकी खोडून मर्दांनो आणि मर्दिनिंनो
टाका त्यांनी लिहिलेला कागद फाडून
आणि लिहा स्वच्छ हातानं
निर्मल मनानं!
आणि लिहायला जागाच नसेल तर
फक्त डोळे उघडे ठेऊन घडवत रहा स्वतःला!