करण्यास चिंब मजला आषाढ मेघ आला
फिरुनी जुन्या स्मृतींचे घेऊन वेड आला
आलिंगण्यास वेगे शोधीत मेघ मजला
नाठाळ वारियाचा होऊन वेग आला
तेजाळ वीज प्यार माझ्यातली धराया
घन नीळ अंबराला पाडून भेग आला
घनघोर वादळाशी झुंजून मेघ न्यारा
दारात ओढलेली मिटवून रेघ आला
तो एकमेव वेडा माझ्याहुनी दिवाणा
सारे कडू विषारी रिचवून पेग आला
अक्षरगणवृत्त – -मात्रा २४