कोमल जल खडकांस कापते
तैसे मार्दव सृष्टी जपते…
फुलाप्रमाणे मृदू बनावे
गुणानुरागी सुरभित व्हावे…..
हृदयपाकळ्या उमलुन येता
झुळकीवर हलके लहरावे,….
चंद्रकिरण प्राशून कुमुदिनी
जैसी फुलते …
मुनीमनातील वचने स्मरुनी
आपण गावे….
आजचा दिवस उत्तम मार्दव…. सर्व साधर्मि बंधु-भगिनींस उत्तम मार्दव धर्माच्या हृदयपूर्वक शुभेच्छा !!!