This Ghazal is written in twenty-seven(27) matras. In the first sher of this Ghazal, the word Ghazal symbolizes a young girl who wants to marry a suitable young boy of her choice.
उपवर झाली, गझल लाडकी, उजवायाची मला;
सर्वांदेखत, तिची पालखी, सजवायाची मला.
कात घालुनी, हिरवी मेंदी, भिजवायाची मला;
पुसून तळवे, ओली नक्षी, रेखायाची मला.
धागे अपुले, इतुके नाजुक, तरी कसे ग पक्के;
त्या धाग्यांची, शत मुंडावळ, विणावयाची मला.
पुस्तकातल्या, गुलाबकळिच्या, गालावरची खळी;
तयात दडली, तुझी आठवण, प्राशायाची मला.
लेकीसाठी, सखी जिवाची, पुत्रासाठी वधू;
सून गुणाची, गोड साजिरी, आणायची मला.
जपुन बियाणे, माती पाणी, प्रकाश छाया हवा;
बाग सुगंधी, सृष्टीमध्ये, फुलवायाची मला.
सांग ‘सुनेत्रा’, मिटून डोळे, हरवलीस तू कशी;
उघड लोचने, तयात कविता, शोधायची मला.