Akasharganvrutta used in this ghazal is GAA LA GAA LA, GAA LA GAA, GAA LA GAA LA, GAA LA GAA.
ऐकते सख्या तुझे बोल कंकणातले
पाहते सख्या तुझे बिंब आरशातले
मी जरी मुकी मुकी ओठ घट्ट दाबुनी
डोलतात कुंडले श्वास कुंडलातले
कुरळ कुंतलांवरी भाळलास तू जरी
मोजते पुन्हा पुन्हा वार काळजातले
वाहतात नेत्र हे बोलतात थेंब हे
निरखिते क्षणोक्षणी अर्थ आसवातले
बोलतोस तू जरी राहतोस बंद का
सांग एकदा मला सत्य तू मनातले
हात दे मला अता खूप भटकले इथे
खोल गूढ शांतता दाव विश्व आतले
वृत्त- गा ल गा ल, गा ल गा, गा ल गा ल, गा ल गा.