स्त्री रत्नाचा ऐसा लौकिक
कनक कोंदणी जैसा मौक्तिक
लौकिक मौक्तिक असेल भौतिक
बाल मनाला त्याचे कौतिक
हृदय मंदिरी देव कैक पण
शुद्धात्म्याचा थाट अलौकिक
अंतरात जरी मूढ गूढता
मृदू कुणाची वचने मौखिक
विशुद्ध भक्ती ज्ञान देतसे
अनुभूतीचा प्रत्यय मौलिक
मात्रावृत्त(८+८ =१६ मात्रा)