This Ghazal is writeen in sixteen(16) matras. Here the poetess says, Your lips are like closed petals of flower. These petals bind me like chain.
ओठ तुझेकी बंद पाकळ्या
मला बांधण्या जणू साखळ्या
नेत्रांमधुनी गझल ठिबकता
जांभुळ गाली निळ्या सावल्या
कवितेचे मी करेन कोंदण
मुखचंद्राला तुझ्या सावळ्या
पायी पैंजण हळू वाजता
थरथरती बघ मूक झावळ्या
ओठांची प्रत्यंचा ताणू
भरावयाला रिक्त रोवळ्या
सोडलेस तू मौन ‘सुनेत्रा’
दुभंग करण्या रूढी आंधळ्या