This ghazal describes how our mind has two sides. One mind tells us to behave according to the rules of the world. At the same time, another mind tells us to behave the way we truly want to – by heart. The state of our mind changes at every single moment. The mind can’t concentrate on one thing at a time.
कळत नाही मज अताशा ती अशी का वागते
मी करी जे ती तयाच्या करुनि उलटे हासते
पदर घेता डोईवर मी उडवते ती मान का
लहरता पण ओढणी ही कान माझा पकडते
वेग येता घाबरे मी धावते ती ऐंशिने
गिअर तिसरा टाकता मी हात माझा दाबते
भजन म्हणता डोलते मी खेळते ती दांडिया
ताल धरता पावलांनी सावराया सांगते
बैसते मी गात गाणी म्हणतसे ती उठ तू
लावता मी नीट सारे ती पसारा मांडते
वय जहाले मी म्हणावे फासते मज रंग ती
रंगल्यावर मग हळू ती केस पिकले दावते
तू सुनेत्रा चंचलागे जाणना ती म्हणतसे
वळचणीला मी उभी अन धार जणु ती नाचते
वृत्त- गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.