काटवट कणा
खेळत्यात सुना
वाकुन वाकुन
करे लेक खुणा
आली आली सासू
उड टणाटणा
देगं दे लुगडं
उघडुन खणा
वटवट सई
करतीया जना
उडदार काळा
नवाच बांधना
जावाई म्हणतो
गाणं म्हण घना
नको नको बापू
पवाडाच म्हणा
ही नणंद मैना
तिला तू वरना
शिवारी जोंधळा
डोलतोय फणा
सुपातला दाणा
जात्यात घालना
म्हण म्हण ओवी
खुंटा फिरवना
काटवट धू धू
पीठ तू चाळना
घाल उतवणी
पीठ तू मळना
करून उंडा
त्याला बडवना
तापल्या तव्यात
भाकर घालना
भाकरी भाजली
तिला उलथना
कडतार दे दे
हात भाजलना
निखारा वडून
तिला फुगवना
गरम गरम
मला तू वाढना
षष्टाक्षरी गीत