अचूक कैश्या घटिका मोजू अंधुक धूसर कातरवेळी
दिवा लाविता ज्योतीवरती पतंग जळती कातरवेळी
बोलायाचे ऐकायाचे बरेच जे जे राहुन गेले
आठवुनी तुज तेच बोलते तुला ऐकते कातरवेळी
जिथे जिथे मी तुला भेटले नजरेमधले गूढ वाचले
अश्या जळिस्थळी शांत तरुतळी फिरून येते कातरवेळी
मौनामधले प्रश्न बोलके अधरावरती गोळा होता
गाते भजने स्तोत्र आरत्या देवापुढती कातरवेळी
हृदयावरती हात जोडता अंतर मिटते अपुल्यामधले
अंतरात मग तुला ठेवण्या डोळे मिटते कातरवेळी
मात्रावृत्त(८+८+८+८=३२)
2 responses to “कातरवेळी – KAATARVELEE”
आवडली कातरवेळ
मला आवडली कातरवेळ कविता.