In this Ghazal radif is ‘Sakhaye’. In this Ghazal spiritual subject is discussed.This Ghazal is written in sixteen(16) maatraas.
काया माझी कापुर सखये
मम आत्म्याची चाकर सखये
तन मन वचने आवर सखये
ती राधेची घागर सखये
प्रथा रुढींची पिके घ्यावया
का हृदयावर नांगर सखये
संस्कृतीतले प्राकृत शोधु
जरी जाहलो नागर सखये
कुणी गुरूना कुणी लघूही
तयातून घे सुंदर सखये
तापव लोणी घृत मिळवाया
तपावीन ना अंबर सखये
जेथे पूजा तिथे ‘सुनेत्रा’
मुग्ध फुलांचा वावर सखये