This Ghazal is written in sixteen(16) matras. Radif of this Ghazal is ‘Lihoo mee’ and kafiyas are kaay, maay, saay(bonsaay), haay, saay, shaay, chaay, taay.
सांग मायना काय लिहू मी
पुत्र लेक की माय लिहू मी
कुंडी मधल्या वटवृक्षावर
विशाल की बोन्साय लिहू मी
मैत्र जिवांचे व्यक्त कराया
नमस्कार की हाय लिहू मी
गझलेच्या भाळावर शीर्षक
क्षीर लिहू की साय लिहू मी
प्रीत कळीला शब्द समर्पक
मुग्ध खरा की शाय लिहू मी
तलफ यावया गझलेसाठी
चहा पिऊकी चाय लिहू मी
सदाच भांडण तुझे ‘सुनेत्रा’
मिटले ते की टाय लिहू मी