In this Ghazal(matala), the poetess says, you are reading my book again and again but you are not reading my eyes. Day by day your thirst is growing because you aren’t taking(accepting) love which stays in my eyes. In the last stanza(sher) the poetess says, when I have closed my eyes purposely then my heart played the role of my eyes. The question is, who is blind here? thats why -you have not tried to open my eyes.
Radif is ‘Tu maze dole’ and Kafiyas are Vachale n, Prashile n etc.
किती चाळशिल पुस्तक माझे वाचले न तू माझे डोळे
म्हणून तृष्णा वाढत गेली प्राशिले न तू माझे डोळे
देहावरची वलये सारी देहामध्ये विरून गेली
वाट पाहुनी स्वप्ने थकली पाहिले न तू माझे डोळे
प्रज्ञा प्रतिभा असून जवळी तुझीच प्रतिमा तुजला जाळी
मेख यातली खरी अशीकी घेतले न तू माझे डोळे
कलाकार तू मधुघट भरिशी दगडी शिल्पामधल्या ओठी
विसरलास की मुद्दामचपण कोरले न तू माझे डोळे
बांधताच मी नयनी पट्टी मम हृदयाचे चक्षू बनले
कोण आंधळा इथे असावा उघडले न तू माझे डोळे