If we love someone by heart, then only we can write Ghazal. This Ghazal is personified as a woman. Here Ghazal has different aspects of her personality. These different aspects are described in this Ghazal. Radif of this Ghazal is ‘Ghazal gulabi’
ज्यांनी केली प्रीत अनावर, त्यांना सुचली गझल गुलाबी;
तलम धुक्याच्या बुरख्यामधुनी, लाज-लाजली गझल गुलाबी!
भल्या पहाटे लहरत आली, प्राजक्ताच्या झाडाखाली;
टपटपणारे मुक्ता-माणिक, माळुन सजली गझल गुलाबी.
मराठमोळा साज लेउनी, सह्याद्रीच्या कडेकपारी;
घोडयावरती मांड ठोकुनी, दौडत फिरली गझल गुलाबी.
दिल्लीच्या दरबारी गेली, उडवुन टोपी भल्याभल्यांची;
घालुन खादी तोऱ्यामध्ये, अशी मिरवली गझल गुलाबी!
पुराण-पोथ्या घेउन हाती, तप्त दुपारी तपास बसली;
अस्तित्वाच्या शोधासाठी, किती भटकली गझल गुलाबी.
स्फटिक जलासम आरसपाणी, गझल ‘सुनेत्रा’ तुझी निराळी;
झुलवून दुनिया बोटावरती, स्वत: न झुलली गझल गुलाबी!