काही क्षण तरी संपुदेत
भावना अन विचार
डोकं व्हावं शांत
गार गार…
पैशासाठी अडवे वाणी
नळाला नाही पाणी
आजाऱ्याला दवापाणी
सततची आणीबाणी!
तरीही सुचतातच गाणी
गाणी गाणी गाणी…
म्हणूनच गाण्यांनो
आता थोडावेळ तरी
द्या विश्रांती खरी..
चार कामं करेन घरी
पगार मिळता खाऊन पिउन
दिसेन थोडी तरी बरी ..
कष्ट करून खरोखरी
पाडेन पैशाच्या सरी
सरी वरी सरी …
मुलाबाळांच्या तोंडी
घास भरवून सुखाचा
म्हणेन राम कृष्ण हरी
होईनच होईन
गाणारी परी!
देणारी परी !!