This Ghazal is written in 30 matras. Radif of this Ghazal is ‘Tu’. Tu means you. Kafiyas are Yave, Barasave, Gathave etc. In this ghazal feelings of women are expressed.
गावे गावे गुणगुणते मी गाण्यामधुनी यावे तू
यावे यावे म्हणता म्हणता दारी मम बरसावे तू
वाट पाहुनी तुझी दिवसभर तुला भेटण्या निघता मी
खुळ्या पावसापरी अकल्पित वाटेतच गाठावे तू
एक एक मी चढे चिरा हा खोल कुणी पण ओढतसे
पंखावर मज घेऊन तेव्हा वरती वरती जावे तू
घुसळुन माती वळीवगंधी वीज भरोनी प्याले मी
सोड गर्व हा तुझ्या नशेवर निशेस या झुलवावे तू
गडगडता तू कोसळता तू मयुरासम मी का नाचू
मोरपीस मी थरथरणारे डोळ्यावर फिरवावे तू
धुक्यापरी या विरताना अन दवापरी मी खिरताना
पूर सुनेत्रा जरी लपविला गालावर उतरावे तू