This ghazal is basically a rivayati ghazal which describes different feelings associated with love. The ghazal has 16 (sixteen) matra’s.
भरती आली आज पुन्हा
तुझी ऐकता गाज पुन्हा
मौन सोडुनी खळखळुनी
झऱ्यासारखे वाज पुन्हा
मनात श्रावण गर्भ हसे
लेइन हिरवा साज पुन्हा
धो धो बरसत ये वळिवा
उन्हात लाह्या भाज पुन्हा
भिजेल माती, वाळूही
अमृत त्यांना पाज पुन्हा
गोड रक्तिमा उतरूदे
होउन गाली लाज पुन्हा
खास ‘सुनेत्रा’ नेत्र तुझे
दाव तयांचा बाज पुन्हा