This Ghazal is written in fourteen(14) matras. Radif of this Ghazal is ‘Tula’ and Kafiyas are madhur, diar, magar, nagar, samar, shishir.
गोड म्हणूकी मधुर तुला
प्रिया म्हणूकी डिअर तुला
पाठीवरती बसताना
सुसर म्हणूकी मगर तुला
निळ्या पहाडी वसलेले
ग्राम म्हणूकी नगर तुला
लाल फुलांचा उत्सव हा
गीष्म म्हणूकी समर तुला
शशांक शशधर राजस तू
चैत्र म्हणूकी शिशिर तुला