सारे काही गोलच गोल
जीव तुझा रे हा अनमोल
कधी कधी जर करशिल झोल
करण्या भाकित एक्झिट पोल
सांग पावसा बडवित ढोल
उन्हास सुद्धा असते मोल
जोर लावुनी खच्चुन कोल
औषध माझे कडवट बोल
अचुक मोजण्या कंपन डोल
डिजिटल काट्यावरती तोल
दार मनाचे आता खोल
हो प्रामाणिक भरून टोल
उतर अंतरी खोलच खोल
हळूच केळे पिकले सोल
मात्रावृत्त (८+७=१५ मात्रा)