गौर – GOUR


This ghazal is written in Akshargan vrutt. Vrutt is GAA GAA LA GAA, GAA GAA LA GAA, GAA GAA LA GAA, GAA GAA LA GAA.
In this Ghazal Radeef is ‘Mee aahe jaree'( मी आहे  जरी) and kaafiyaas are Moun, Soudh, Doul(  मौन,  सौध, डौल) etc.  This type of’ kaafiyaa is known as Swaraanchaa Kaafiyaa(स्वरांचा काफिया).

डोळ्यात माझ्या मुग्ध प्रतिमा मौन मी आहे जरी
म्हणतात का मज पायरी ते सौध मी आहे जरी

देहात माझ्या मूर्त लेणी श्याम सुंदर देखणी
बेडौल ते म्हणतात मजला डौल मी आहे जरी

थंडी गुलाबी पांघरोनी मेघ गाती अंबरी
आषाढ ते म्हणतात मजला पौष मी आहे जरी

संगीत मंजुळ निर्झराचे गझल मी वेड्या तुझी
वेडी मला म्हणती शहाणे शौक मी आहे जरी

तृप्तीविना भक्ती नसे भरल्याविना वाहू कसे
पाण्याविना बघ रिक्त येथे हौद मी आहे जरी

जिंकून किल्ले सागरी दुर्गा हसे मी भूवरी
काली मला म्हणतात का ते गौर मी आहे जरी

जाणून मी भाषा मऱ्हाटी फिरविते आसास या
पाटील ते म्हणतात मजला गौड मी आहे जरी

मांगल्य मम लज्जेतले लाली तिची पूर्वेवरी
आदित्य मग म्हणती कुणी मज भौम मी आहे जरी

कैसे म्हणू मी ज्ञात त्यांना वस्त्र-प्रावरणे धुणे
पिळतात इतुके घट्ट मजला क्षौम मी आहे जरी

वृत्त – गा गा ल गा, गा गा ल गा, गा गा ल गा, गा गा ल गा.
वृत्ताचे नाव – मंदाकिनी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.