This Ghazaadif of this Ghazal is written in Matravrutta. Radif of this Ghazal is Sakhaya and Kafiyas are Dolaa, hindolaa, golaa, Polaa, Molaa, Bholaa, Solaa.
घन करवंदी डोळा सखया
झरणारा हिंदोळा सखया
मुठीत नाही रहावयाची
मी बर्फाचा गोळा सखया
खेळशीलका जपून धुळवड
सण बैलांचा पोळा सखया
गोड रसाचे गुऱ्हाळ वाजे
इक्षू चोळामोळा सखया
भांग समजुनी पितोस लिमका
किती किती तू भोळा सखया
म्हणू नको ना तिला बहकली
वय गझलेचे सोळा सखया