चमचा – CHAMACHAA


This Ghazal describes various types of spoons and their work. Spoons play important role in human beings life. In this Ghazal radif is ‘mee tar chamachaa’ and kafiyas are banavito, ghaalato, puravito etc.

आंबट चिंबट भेळ बनवितो मी तर चमचा
कडवट तोंडी घास घालतो मी तर चमचा

तिखट मीठ अन मस्त फोडणी सुटता पाणी
सैल जिभांचे लाड पुरवितो मी तर चमचा

जरा इकडचे जरा तिकडचे ढवळत असता
कढईमध्ये तोंड बुडवितो मी तर चमचा

भांडयामध्ये कढी उकळते मी नच हलतो
शिळ्या द्रावणा ऊत आणतो मी तर चमचा

डाव म्हणा वा पळी म्हणा मज वा भातोडी
रूप बदलुनी मीच वाढतो मी तर चमचा

अंग झटकुनी कधी उडवितो शिंतोडेही
सावध सावध बोल बोलतो मी तर चमचा

गझल प्रीतिची नको ‘सुनेत्रा’ सोवळ्यात मी
पुसून घासुन लख्ख झळकतो मी तर चमचा

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.