In this ghazal, the poetess gives the message of seeing the world without any prejudice. This way, we can see things with a new perspective and outlook.
vrutta- GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA.
चष्मा असून सुद्धा मी घालते न चष्मा
काटे रुतून सुद्धा मी घालते न चष्मा
चष्म्यात रंग भरता रंगीत बाग दिसते
सारे कळून सुद्धा मी घालते न चष्मा
जेव्हा उन्हात फिरते डोळ्यात आग चढते
काळा करून सुद्धा मी घालते न चष्मा
का आज लोक मजला पाण्यात पाहताती
कोडे पडून सुद्धा मी घालते न चष्मा
चष्म्याविना सख्या तू मज नेहमी पहावे
आशा फुटून सुद्धा मी घालते न चष्मा
हृदयास साक्ष डोळे बघ बोलते ‘सुनेत्रा’
साध्वी नसून सुद्धा मी घालते न चष्मा
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.