चारित्र्य प्रीत माझी – CHARITRYA PRIT MAZI


This Ghazal is written in aksharganvrutta; GAA GAA LA GAA, LA GAA GAA… This Ghazal is Jadid Ghazal.

ते शोधतात आता चघळावयास काही
मिळते न ते म्हणोनी ते ओढतात बाही

गाणार गीत गझला द्याहो सतार मजला
भेटेल मग मलाही कृष्णासवेच राही

काळीज धडकतेका त्यांचे सशापरी हो
त्यांचा न दोष काही देणार कोण ग्वाही

मी घालताच छापा घाला लगेच बेडया
सत्ता निलाजरी ही फिरवा दिशात द्वाही

चारित्र्य प्रीत माझी अंगार बरसते ती
अन सांगते ‘सुनेत्रा’ माझ्यात बर्फ नाही

वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.